Your Ad Here

Puneri New year resolutions 2010  

Posted by Vinod Malgewar in ,

२०१० साठीचे संकल्प... कारणांसहित...
२०१० साठीचे संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे.

सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही.
कारण -
अ. - पल्लवी जोशी - आपण तिच्या घरी आरतीला बसल्यासारखं ती टाळ्या वाजवायला लावते. एकदा गीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग संगीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग गायक .... मग वादक.... मग प्रेक्षक..... मग श्रोते...... मग मान्यवर..... मग ती स्वत:..... असं नुसत्या टाळ्याच टाळ्या.... ! बर नुसत्या टाळ्या नाही तर जोरदार टाळ्या. वाट्टेल ते मॅचिंग करुन, वाट्टेल त्या गाण्याला, वाट्टेल त्या शब्दांनी, तिला ओ का ठो कळत नसताना, मळमळेल इतकं कौतुक करते. अगदी कुणी ढेकर जरी दिला तरी, "काय अप्रतिम ढेकर दिलास आणि माझ्या खुप आवडीच्या ढेकरांपैकी एक ढेकर दिलास म्हणुन तुझे विशेष आभार.... " काय बोलयचं ह्यावर.... ?
ब. - अवधुत गुप्ते तिचा मोठा भाऊ - "अरे... अरे... अरे... काय भन्नाट, सुसाट, अचाट गायलास... मित्रा..... कानाचे पडदे पार फाडलेस बघ... अरे काय साजुक खाऊन नाजुक गळ्यातुन चाबुक ढेकर दिलास गड्या.... एक नम्बर.. माझ्या एकातरी गाण्यात हि हार्मनी वापरणार बघ मी.....
क. बाळासाहेब मंगेशकर - (खयाल गायकी, शोभा गुर्टु, तंबो-याचा तारा, स्वातंत्र्यपुर्व काळ, ज्ञानेश्वर महाराज, आकाशवाणी अशा विविध विषयांवर बोलल्यानंतर सुमारे पावणे दोन तासांनी...) "...१९६३ मध्ये लताच्या रेकॉरडींगच्या वेळेस गाणं गाताना तिला असाच विलंबीत ढेकर आला होता. त्यावेळेस मी तिच्याकडुन वरचा ढ लावुन घेतला आणि..... ............ ......... ......... ......... ......... ......... ..
............ ......... ......... ......... ......... ......... ......... ......... ....... .
............ ......... ......... ......... ....... ............ .........
............ ......... ..... ............ ......... ......असो.... !

बायकोशी कधीही भांडणार नाही.
कारण - ह्याची सुमारे ६७ कारणं देऊ शकेन पण तुर्तास.....
अ. - ती तिच्या चुका मान्य करत नाही.
ब. - जीभेला हाड नसतं, हे ती सिद्ध करते.
क. - परवा तिनी तिचे सगळे दोष मान्य केले पण पुढे म्हणाली की, " माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला आणि एकदा जरा आरशात........
............ ......... ........असो.... !

खोटं बोलणार नाही.
(हे जरा अशक्य कोटीतलं होतय का ? बर मग ... खोटं बोलुन ऑफीसला दांडी मारणार नाही.)
कारण -
अ. - हयात व्यक्तींना मारल्यानी ब्रह्महत्येचं पाप लागतं.
ब. - ह्या दांडीची नोटीस देता येत नाही त्यामुळे सुट्टीची खातरी नसते. ती मिळालीच तर पकडले जाण्याची भिती दिवसभर वाटत राहते. सुट्टीचा आनंद मिळत नाही.
क. - नेमकं बॉसच्या हातुन पण त्याच दिवशी ब्रह्महत्येचं पातक घडले असल्यास तो तिथं थेटरात भेटण्याची दाट शक्यता असते. ..आणि दुःख विसरायला आलोय हे कारण त्याला पटत नाही. त्याचं तिथं येण्याचं कारण सांगायची त्याला गरज नसते.
ड. - खरच ती हयात व्यक्ती कधी गचकली तर जाणं अवघड होतं आणि मग नविन हयात व्यक्तीच्या हत्येचं पाप....
............ ......... ........असो.... !

दारु पिणार नाही.
कारण -
अ. - तोल जातो.
ब. - पैसे जातात
क. - चव जाते.
ड. - शुद्ध जाते.
ई. - दृष्टी जाते.
फ. - मजा जाते.
ग. - इज्जत जाते.

कितीही ओळखीची वाटली तरी समोरची बाई जोपर्यंत ओळख देत नाही, तोपर्यंत मी बघुन हसणार नाही.
कारण -
अ. - तिच्याकडुन डाव्या गालावर...
ब. - संधीसाधु समाजाकडुन सर्वांगावर....

पुण्यातल्या पीएमटी बसमध्ये पाऊल टाकणार नाही. (बसमध्ये बसणार नाही, असे लिहले नाहीये कारण आजपर्यंत मला कधीच बसायला मिळाले नाहीये.)
कारण -
अ. - उरलेले सुट्टे पैसे, चपला आणि सगळी हाडं परत मिळत नाही.
ब. - हव्या त्या स्टॉपवर उतरता येत नाही. जिथं उतरावं लागतं तिथं खाली कुणाची तरी दुचाकी असतेच. तो जिथं सोडेल तिथुन परत (बस करुनच) यावं लागतं.
क. - पुढुन चढुन देत नाहीत, सर्कस करायचा अनुभव नसल्यास मागुन चढता येत नाही. ड्रायव्हर तोंडात गुटका असल्याने बोलत नाही, कंडक्टर ऐकत नाही.
ड. - तिकीट चुकवुन.... म्हणजे चुकुन राहिल्यास चेकर बापाचा उद्धार....
............ ......... ........असो.... !

This entry was posted on Tuesday, January 12, 2010 at 8:31 PM and is filed under , . You can follow any responses to this entry through the comments feed .

2 comments

Indrayani  

this is too gud.....ekdam chan....

March 26, 2010 at 4:00 PM
Bhaskara  

too good

November 18, 2010 at 12:24 AM

Post a Comment

Post a Comment