Punyachya दोन तरुण मुली समोरासमोर आल्या आणि संवाद सुरु झाला ...
इतकं काही नको ओळख नसल्यासारखं तोंड चुकवून जायला -
इश्श! तोंड चुकवायला काय कर्ज नाही घेतलं!
पण ब्लाउज घेतला होतास तो? बहुतेक हरवला असेल! जॉंर्जेटच्या साडीसारखा.
तीन दमडीचा ब्लाउज!
म्हणजे तुला महागच!
पन्नास ब्लाउज आणून देइन -
शेवटी मधूला सोडुन लॉंड्रीवाल्याशीच जमवलस वाटतं?
काम म्हणून -
त्याशिवाय पन्नास ब्लाउज कुठून देणार? मधुनं दिली वाटतं चाट!
अशी चाट खायला मी म्हणजे तू नव्हे! तरी बरं अरविन्दा गेला त्या मंदाच्या मागं -
हो जातोय! डोळे नाही फुटले त्याचे चकणिच्या मागे जायला -
तुला पाहतांना फुटले होते वाटतं?
कां, तुझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही म्हणुन?
असल्या छप्पन अरविंदाना पातळं धुवायला ठेविन मी !
हो क्का? चाळीतली पातळं धुवायचं कंत्राट घेतलय का तुझ्या पोष्टमन बाबांनी?
आहाहा! तरीच एस्सेसीत गचकलीस तीनदा! पोष्टमास्तरला पोष्टमन म्हणत नाहीत इंग्रजीत!
तुझी आई तर सारखी त्यांना पोष्टमन म्हणते रात्रंदिवस!
चोरुन ऎकायची सवय जात नाही म्हणायची!
आईला जरा आवाज हलका करायला सांगा - आगीचा बंब गेल्यासारखी ठणठणते! चोरुन नाही ऎकांव लागत -
हो, तुझी आई म्हणते कोकिळाच की नाही! तरी बरं, परवा सगळी चाळ जमा झाली -
आणि तुझ्या आईच्या झिंज्या पकडल्या तेव्हा वाजवल्या ते का नाही सांगत?
हॉ हॉ हॉ ~!
वेडावतेस काय माकडासारखी -
तुझा अरविन्दा एक माकड आहे. म्हणुन सगळीच माकडं वाटली तुला? राधेला म्हणे सगळीकडेच कृष्ण दिसत होता.
ही ही ही ही! गणपती उस्तवात चोरुन दुसऱ्यांच्या कविता आपल्या नावावर म्हटल्या म्हणजे काय सगळीकडे काव्य नको.
चोरायला काय तुझे बाबा नाही मी. पुरुषासारखा पुरूष असून कोळसे चोरतो!
बाबांच नको हं नाव घेऊ!
मम्मीला सांग तुझ्या. मला कशाला सांगतेस? दिवसभर तर नाव घेते. गोपाळ गोपाळ गोपाळ करुन.
माडर्न मम्मी तुझी- लिपष्टिक लावली म्हणून काय अक्कल नाही आली!
मग तुम्ही फासा तोंडाला-तुमचे कोणी ओठ धरले आहेत?
तुझी मम्मी ओठाला लावते का लिपस्टि~~क? मला वाटलं. समोर आलेल्या दाताला-
खरे दात आहेत - कवळी नाही तुझ्या आई सारखी!
चप्पल मारीन, सांगते!
आहे का पायात? वा वा! आहे की! तरीच हल्ली रोज देवळात जातेस - रोज नवी चप्पल!
बघायचिय का?
बघू - माझीच असेल!
ही बघ .. फाट!
-- अघळपघळ - पु.ल
राजेसाहेब (टाळी वाजवुन) : कोण आहे तिकडे?
सेवक : मी महाराज..
राजेसाहेब (रागावुन) : मुर्खा, मी महाराज? का तु महाराज?
--
एकदा एक माणुस पुणे-दिल्ली रेल्वेने प्रवास करत असतो.
त्याच एका गुंडाशी भांडण होत.
गुंड म्हणतो "एक कानाखाली वाजवेन तर सरळ दिल्ली ला पाठविन."
माणुस म्हणतो "जरा हळु मारा, मला भोपाळला उतरायच आहे".
--
हस्तव्यवसायाच्या शिक्षिकेने सर्व मुलांना पुठ्ठयाचे घर बनवून आणण्यास सांगितले. त्यानुसार बंडूखेरीज सर्वांनी घरे बनवून आणली. बंडूने नुसते कागदाचे कापलेले तुकडे दिले.
"गाढवा, याला काय घर म्हणतात का?" बाई ओरडल्या.
"हो बाई, आमचे घर लातूर जिल्हयात होते. सध्या ते असेच आहे." बंडू शांतपणे म्हणाला.
--
वडील : हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शुन्य, वर्तणूक वाईट, अक्षर घाणेरडे.
मुलगा : बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे..
--
शाळेचा पहीला दिवस असतो..
शिक्षक : अरे तु उठ.. तुझ नाव सांग..
पहिला विद्यार्थी : नरु
शिक्षक : अरे अस नाही म्हणायच, "नारायण" अस पुर्ण म्हणायच..
शिक्शक (दुसऱ्या विद्यार्थ्याला) : बाळ, आता तु तुज नाव सांग बघु..
दुसरा विद्यार्थी : "रामायण" !!!
--
शिक्षक : कोणी मला "राजा राम मोहन रॉय" बद्दल माहिती सांगेल का ?
एक विद्यार्थी : ते चार चांगले मित्र आहेत..
--
Tu aani Mi
Post a Comment